Sunday, April 6, 2014

.ईनाडू पोर्टल जॅाइन करुन तीन आठवडे झाले.

'नमस्कार, मी सागर गोखले 'महाराष्ट्र माझा' मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी...'

सुमारे १५ वर्षापुर्वी सागरदाच्या याच स्टाइलने महाराष्ट्रातील तमाम तरुणांना टीव्ही जर्नालीझम मध्ये येण्याची सुप्त इछा निर्माण केली. त्या तमामपैकी मीही एक 'आम' तरुण होतो. योगायोग इतका चांगला की पाच वर्षापुर्वी साम टीव्हीत मला सागरदा बरोबर तीन वर्ष काम करण्याची संधी मिळाली. मुंबईत महिनाभर त्यांचा सहवास मिळाला आणि आता पत्रकारितेची दहा वर्ष पुर्ण करताना त्याच ईटीव्हीच्या वेब पोर्टलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. रामोजी फिल्म सिटीच्या ज्या स्टुडिओतून प्रसारीत होणारे मराठीतील पहिले बातमीपत्र आपण पहायचो त्याच स्टुडिओला लागून माझी न्युझरुम आहे. त्यामुळे महाविद्यालयात ज्या चॅनलबद्दल कमालीची उत्सुकता होती त्या संस्थेत काम करण्याचा आनंद मी अनुभवतो आहे.ईनाडू पोर्टल जॅाइन करुन तीन आठवडे झाले.
एव्हाना ईनाडू आणि हैद्राबादच्या मातीशी चांगली गट्टी जमली. गम्मत अशी की ईनाडू पोर्टल तब्बल सहा भाषामध्ये सुरु होतोय. मराठी, हिंदी, इंग्लीश, कन्नड, बंगाली, गुजराती आणि तमीळ. त्या प्रत्येक भाषेत काम करण्यासाठी त्या-त्या राज्यातील १२ ते १५ उपसंपादक आले आहेत. म्हणजे संपुर्ण भारतातील सर्व महत्वाच्या मोठ्या शहरातील उपसंपादक आले आहेत. त्या सगळ्यांबरोबर काम करताना भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीतील माणसं एकोप्याने कशी नांदताहेत याच खऱ्या अर्थानं दर्शन रोज घडतं
 सोलापुरच्या पुर्व भागात राहिल्यामुळे मला तेलुगु भाषा बऱ्यापैकी जमते. त्यामुळे हैद्राबाद, विजयवाडा, गुंटूर येथून आलेल्या पत्रकारांशी माझी लगेच मैत्री जमली. माझ्या आवडीचे गायक एस पी बालसुब्रमनीअम आणि संगीतकार ए आर रेहमान तामीळनाडूचे. त्यांची गाणी रुम मध्ये अनेकदा साऱ्यांसमोर गायली. त्यामुळे तमीळना़डू डेस्कच्या पत्रकार मित्रांना इतकी आवडली की चैनैइचा कार्तिक अन कोइम्बतूरचा श्रीपती आता माझ्याकडून एसपी चे एक तमीळ गीत पाठ करुन घेताहेत आणि मी त्यांना हिंदी शिकवतो आहे. तमीळ बांधवाना हिंदी खुप कमी येत त्यामुळे आमच्यातील सगळा संवाद तोडक्या मोडक्या इंग्लीश मध्ये होतो. त्यानिमित्ताने दोघांचंही इंग्लीश सुधारत आहे त्या इग्रजी संवादाची मौज काही औरच आनंद देते. बेंगलोर आणि बेळगावच्या दोन कानडी मित्रांशी नुकतीच ओळख झालीय. माझ्या मराठी डेस्कला लागूनच असलेल्या गुजरात मधील सुरत, अहमदाबादच्या कौशिक आणि के के जडेजा आणी रुपेश यांच्या बरोबर ईनाडूच्या कँटीनमध्ये दररोज दुपारचं जेवण करताना नरेंद्र मोदी आणि गुजरातमधील दंगलीवर गप्पा नाही झाल्या तर जेवण झाल्यासारखं वाटतं नाही. पश्चिम बंगालच्या मैत्रीणींकडून ब्योमकेश बक्षी या पुस्तकाबद्दल एकताना लहानपणी पाहिलेल्या मालिकेचा एकेक भाग आठवतो. शिवाय परभणीचा तुषार, लातूरचा राहुल, नागपूरचा सुरज, बार्शीचा महेश, सातारचा मुकेश, पुण्याचा रवी, तहसीन, पंढरपूरची उमा, नाशिकची निकिता आणि ग्वाल्हेरची नाझनीन, दिल्लीचा आरीफ, पाटणाची अर्चना, डेहराडूनची निशा असा अखिल भारतीय पातळीच्या पण जवळच्या मित्रांचा तयार झालेल्या ग्रुपचा कल्ला तर ओफिस, बस, कण्टीन, रूम सगळीकडे असा रंगतो की बस्स पुछो मत यार.. अन मराठी डेस्कचे चीफ नागपूरचे मनोज जोशी आणि इटीव्ही मध्ये तब्बल १४ वर्षाचा अनुभव असलेल्या अभ्युदय रेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्टल सुरु होण्या आधीची सर्व तयारी जोरदार सुरू आहेच. येथे जो अनुभव मिळतोय तो भारतातील कुठल्याही मिडीयात मिळणार नाही असं इथं काम करुन आलेले माझे अनेक सहकारी संगतात ते काही खोट नाही. पहिले दोन आठवडे रामोजी फिल्म सिटीतील हॅाटेलमध्ये रहायची व्यवस्था होतील. त्यावेळी दररोज ओफीस संपपल्यावर मी अन पुण्याचा बातमीदार तुषार रुपनवर आणि दिल्लीचा आरीफ रामोजीतील वेगवेगळ्या रस्त्याने चालत होटेल गाठायचो त्यावेळी घडलेल्या फिल्म सिटीचं सौंदर्य पुढच्या भागात.

Friday, August 26, 2011

सरकारने आंदोलनाचा इतिहास विसरू नये आणि आपण भगत चा लढा...

गोष्ट १ : जुलमी सायमन कमिशन लागू करण्यासाठी जेंव्हा जॉन सायमन लाहोर मध्ये आला तेंव्हा लाला लजपतराय च्या नेतृत्वाखाली भगतसिंग नेही 'सायमन गो बेक' असं 'गांधीवादी' शांतीपूर्ण आंदोलन केलं होत. मात्र इन्सपेक्टर सेंडर ने लाला लजपतराय आणि जमावावर लाठी चार्ज केला. लाला शहीद झाले. दुसऱ्याच दिवशी भगत, राजगुरू आणि आझाद आणि साथींनी सेंडर चा खात्मा करण्याचा प्लान केला. दुसऱ्याच दिवशी भगतने सेंडर च्या डोक्यात तीन गोळ्या घालून सेंडर चा खात्मा केला.
रामदेव बाबांचं गांधीवादी आंदोलन लाठीचार्ज ने सरकारने मोडीत काडलं, अण्णांच्या आंदोलनात सरकार दडपशाही करू पाहतय दुर्दैवान तसं झाल तर एका सेंडररुपी मंत्री साठी १० भगत तयार होतील ... अन मंत्रीमंडळासाठी शेकडो भगत तय्रार होतील.
 
मोरल :  सरकारने आंदोलनाचा इतिहास विसरू नये आणि आपण भगत चा लढा...

Sunday, December 26, 2010

दीपक होमकर साम मराठी सोलापुर


फोटो कसा वाटला? कुठली स्टोरी केलि असेल ते ओलखा पाहू?